आज १ मे महाराष्ट्र दिन 1st may Maharshtra day

हे राज्य आहे,शिवछत्रपतींच्या पराक्रमाने,मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेले.
हे राज्य आहे, ज्ञानोबा-तुकोबा,नामा-गोरोबा-एकनाथ या संतांच्या लोकवाङ्म्याने,विचाराने समृद्ध झालेले.
लढता लढता मरण आले तरी शरण जाणार नाही हा बाणा असणारे,
देव,देश,धर्म यांच्यासाठी प्राणाची आहुती देणारे,वीर घडवणारे,
राष्ट्राला आधुनिकतेचा विचार देणारे,
गोखले, रानडे,शाहू,फुले,
यांच्या विचारांचे.
हे राज्य आहे,
पददलित,दिनदुबळ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे
आंबेडकरांच्या विचारांचे,
हे राज्य आहे,
सावरकर,राजगुरू,चाफेकरांच्या
क्रांतिकारक विचारांचे
हे राज्य आहे,
कर्मवीर भाऊराव,महर्षी कर्वे,महर्षी शिंदे,यांच्या शैक्षणिक चळवळींच्या विचारांचे,
हे राज्य आहे,
शिवरायांनी स्थापन केलेल्या
गाडकोटांचे,
हे राज्य आहे,
सह्याद्रीच्या भव्य दिव्य वैभवशाली दऱ्याखोऱ्यांचे,
हे राज्य आहे,
अजिंठा-वेरूळ,कार्ला,एलिफंटा
यांसारख्या कलांचे,
हे राज्य आहे,
प्रतिभासंपन्न इतिहास लाभलेले,
गरज पडली तेव्हा देशाचे नेतृत्व करणारे,
हे राज्य आहे,
या राज्यातील भावनांचे
आणि हे राज्य आहे
*”🚩महाराष्ट्र🚩”*
*आज १ मे महाराष्ट्र दिन*
आपल्याला,व आपल्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..💐
*🚩🚩जय शिवराय🚩🚩*
*🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩*

1st may maharshtra divas

Leave a comment